Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत

ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत

कोरपना:सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 824 ग्रामपंचायती पैकी बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या 742 आणि अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीची संख्या 82 या करिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करून दिलेले आहे.

कोरपणा तालुक्यातील एकूण 52 ग्रामपंचायतीपैकी बिगर अनुसुचित क्षेत्रातील 28 ग्रामपंचायती आणि अनुसूचित क्षेत्रातील 24 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सरपंच आरक्षण सोडतीचे आयोजन दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:00 वाजता तहसील कार्यालय कोरपणा येथील सभागृहात केले आहे. सदर सरपंच सोडत बैठकीसाठी कोरपना तालुक्यातील सर्व जि.प. सदस्य / पं.स. सदस्य / ग्रामपंचायत सरपंच/सदस्य आणि सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार श्रीमती पल्लवी आखरे यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!