Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

ट्रकच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू

ट्रकच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू

कोरपना, – आज संध्याकाळ 6:05 च्या सुमारास कोरपणा येथील गणेश मोड जवळ एका हृदयद्रावक घटनेत एका अज्ञात व्यक्तीचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोरपना येथे घडली. एक भरधाव वेगात सिमेंट भरलेला ट्रॅक क्रं.TN-18AO- 0627 आदिलाबाद कडे जात असताना, अचानक एक इसम रस्त्यावर आला आणि ट्रक त्याला धडकला.

धडक इतकी जोरदार होती की त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयाचे कोरपणा येथे पाठवण्यात आला आहे.

मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Popular Articles