मैत्रीचा पुनर्जन्म
माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मिलन
कोरपना – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय कोरपनाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा व गुरुवर्यांचा सन्मान समारंभ सोमवार दिनांक १२ मे ला वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येथे पार पडला. 
या स्नेह मिलन मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पी. बी. बोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य डी. जी. खडसे , संजय ठावरी सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक नारायण हजारे, मारोती टेंभुर्डे, मारोती उईकें, प्रा.अरुण कुकडे, प्रा. ज्योती रेगुंडावार, प्रा. बांबोडे , प्रा. विलास भोयर, प्रा.पंदाम, प्रा. रमेश येलपुलवार , जिल्हा परिषद शाळेच्या सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षिका शारदा हजारे, शिक्षक. रामकृष्ण मोहितकर,ओंकार घुघुल, घनश्याम पाचभाई, राजेंद्र कांबळे, लोखंडे,संगीता दरने, संध्या खंगार, पुष्पा सोयाम, संध्या चिवंडे, दादाराम घुबडे, संतोष देरकर, हेमंत लोडे, विलास धोटे, राजू लांडगे, ठवसे आदी उपस्थित होते. या सोहळ्याला १९९६ ला जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गापासून प्रवेशित २००२ इयत्ता सातवी पर्यंत शिकलेल्या आणि वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २००० मध्ये पाचव्या वर्गापासून प्रवेशित २००८ बारावीपर्यंत शिकणाऱ्या सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनीचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली व माजी विद्यार्थी श्रीकांत आसुटकर यांच्या सुमधुर आवाजातील स्वागत गीताने झाली. तत्पूर्वी उपस्थित मान्यवर यांचा सन्मान करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर गुरुजन
व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता परसुटकर , संचालन संतोष हंसकर तर आभार उपेंद्र मालेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सबा अंजुम, नदीम सय्यद , स्नेहल आवारी, रुपेश बोरडे, विकी आमलेपवार, ओम पवार, जयंत जेनेकर, अमोल रणदिवे, विशाल मंचलवार, मोहब्बत खान, रिता कारेकर, मनीषा निबुदे, राकेश पिंपळकर, विपीन डोके, ईश्वर तुरनकार, सुनील देरकर, प्रियंका कोटावार, दीपक एकरे, कुशाब मालेकर, दिग्विजय भोंगळे, अमित झुलकंटीवार, विकी मंचलवार, शितल मुनघाटे ,सोनम राऊत, लोकेश्वरी मोडक, यास्मिन शेख, आशिया शेख, तेजस्विनी हरबडे, शुभांगी बेरड, शशिकांत हंसकर, प्रिया ढवस, सुवर्णा मालेकर , मंगेश येसेकर, सतीश मुसळे,राहुल भुसारी, प्रशांत भोसकर,जयश्री निरांजने, स्वप्निल आखाडे, नैनेश आत्राम, स्मिता झूलकटीवार, योगिता दरणे, तृप्ती गोडे , संदीप माणूसमारे , अर्चना दरने , मिलिंद देवडे, नीता वासेकर , मंगला घुघुल, आशिष मोहुर्ले , प्रशांत बोरकुटे, आकाश नागपुरे, निलेश डाखरे , आशिष पेचे, तुळशीराम बल्की , अतुल पायघन , अमोल वाघमारे आदीनी सहकार्य केले.
शाळेच्या आवारात एकत्रित छायाचित्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या वास्तू पुढे माजी विद्यार्थी व शिक्षकांनी स्नेह मिलन आठवणीचा ठेवा म्हणून एकत्रित छायाचित्र काढली.






