Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

प्रशिक्षणाच्या माध्यमातून नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

चंद्रपूर, दि. 21 : पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती व इतर आपत्ती वेळी नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच चंद्रपूर तालुका प्रशासनाच्या वतीने लोहारा येथील तलावावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणाला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी नागरिकांना सीपीआर, नैसर्गिक आपत्तीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन दलातर्फे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. सदर प्रशिक्षणाचा लाभ गावातील नागरीक तसेच तालुक्यातील पोलीस पाटील, इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा सेवकिा, आपदा मित्र, आपदा सखी, पट्टीचे पोहणारे नागरिक यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख व त्यांच्या टीमने सहकार्य केले.

Popular Articles

error: Content is protected !!