Saturday, April 18, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

पेनगंगा नदीत हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस बचाव पथक सज्ज

पेनगंगा नदीत हरवलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस बचाव पथक सज्ज

कोरपना: पेनगंगा नदीत हरवलेल्या एका व्यक्तीच्या शोधासाठी स्थानिक बचाव पथक पूर्णपणे सज्ज झाले आहे. काल रात्री 9:00 च्या सुमारास सतिश चिकराम यांची पेनगंगा नदी जवळ हिरो लिवो, गाडी आढळली अशी माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पेनगंगा नदीच्या पुलावर एक बाईक आढळल्याने स्थानिक प्रशासनाने त्वरित दखल घेतली, नागरिकांनी माहिती दिली, या घटनेची माहिती मिळताच, पोलीस रेस्क्यू टीम चंद्रपूर, स्थानिक पोलीस प्रशासन यांनी तातडीने बचाव कार्याची तयारी सुरू केली.

आज सकाळी, विशेष प्रशिक्षित बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या पथकात 10 ते 12 सदस्य असून, त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स, शोधमोहिमेसाठी लागणाऱ्या बोटी, अशी आधुनिक उपकरणे आहेत.

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नदीचा प्रवाह आणि सद्यस्थितीचा अभ्यास करून शोधमोहिमेची आखणी करण्यात आली आहे. “आम्ही शक्य तितक्या लवकर हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत,” असे एका अधिकाऱ्याने नमूद केले.

या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हरवलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला लवकर मदत मिळण्याची विनंती केली आहे. बचाव कार्य सुरू झाले असून, लवकरच काहीतरी यश मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Popular Articles

error: Content is protected !!