Tuesday, October 13, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग 353-B देवघाट टोल नाक्याचे उद्घाटन

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग 353-B देवघाट टोल नाक्याचे उद्घाटन

कोरपना: राष्ट्रीय महामार्गावरील नवीन टोल नाक्याचे उद्घाटन आज उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या हस्ते करण्यात आले. “देवघाट टोल नाका” या टोल नाक्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

​गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर टोल नाक्याचे काम सुरू होते, ज्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात त्रास होत होता. मात्र, आता काम पूर्ण झाल्यामुळे हा टोल नाका आजपासून नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. टोल नाक्याच्या उद्घाटनावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणाले की, “या टोल नाक्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. तसेच, टोल व्यवस्थापनाने प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर भर द्यावा.”

​हा टोल नाका आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, येथे फास्टॅग (FASTag) सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे टोल भरण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद होईल. या टोल नाक्यामुळे परिसरातील आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

​यावेळी प्रामुख्याने उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, उपनिरीक्षक देवानंद केकन, जी. आर. आय. एल. कंपनीचे सीनियर लीगल मॅनेजर पुनम अर्जापुरे,  भाजप युवा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, लोणी येथील सरपंच अविनाश वाभीटकर,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ता शहेबाज अली, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे इंजिनीयर अमित वाढी, तसेच एम. डी. करीमुनिसा टोल एजन्सी व्यवस्थापनाचे अधिकारी ताहीर बेग, टोल ऑफिसर (IT) तसेच टोल  टोल व्यवस्थापनाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Popular Articles

error: Content is protected !!