Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

काळ बनून उभा होता वाळूचा ट्रॅक्टर! कोठोडा फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

काळ बनून उभा होता वाळूचा ट्रॅक्टर! कोठोडा फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

कोठोडा: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाळू भरलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना कोठोडा फाट्याजवळ घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​कोठोडा येथील रहिवासी दिगांबर सातपुते (वय ५५-६०) हे आज आपल्या दुचाकीवरून कोठोडा गावाहून पारडीकडे जात होते. घरासाठी गहू दळण्यासाठी ते गाडीवर गव्हाचे पोते घेऊन निघाले होते. कोठोडा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर उभा होता. सातपुते यांची दुचाकी या उभ्या ट्रॅक्टरवर पाठीमागून प्रचंड वेगाने धडकली.

​अपघाताची भीषणता: धडक इतकी भीषण होती की, दिगंबर सातपुते यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, परंतु मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

​
​​वाळू वाहतूक आणि सुरक्षेचा प्रश्न: रस्त्यावर उभ्या असलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरमुळे हा अपघात झाल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकदा रस्त्याच्या कडेला असुरक्षितपणे वाहने उभी केली जातात, जी काळ बनून समोर येतात. या घटनेमुळे सातपुते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Popular Articles

error: Content is protected !!