Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

‘निराधारां’च्या पैशांवर पोस्टाचा ‘डल्ला’? हक्काचे १५०० रुपये मिळवण्यासाठी गरिबांच्या चकरा.

‘निराधारां’च्या पैशांवर पोस्टाचा ‘डल्ला’? हक्काचे १५०० रुपये मिळवण्यासाठी गरिबांच्या चकरा.

कोरपना पोस्ट ऑफिसचा मनमानी कारभार; खात्यात पैसे असूनही निराधार लाभार्थीं रिकाम्या हाती!

कोरपना: शासनाच्या विविध निराधार योजनांच्या माध्यमातून मिळणारे तुटपुंजे मानधन हाच अनेक वृद्ध, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. मात्र, कोरपना येथील पोस्ट ऑफिसमध्ये या लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. खात्यात १५०० रुपये जमा असूनही पोस्टाकडून ते देण्यास नकार दिला जात असल्याने निराधारांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या पोस्ट बँक खात्यात जमा झाले आहेत. नियमानुसार, हे पैसे लाभार्थ्यांना गरजेनुसार काढता येणे अपेक्षित आहे. मात्र, कोरपना पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी ‘पैसे उपलब्ध नाहीत’ किंवा ‘तांत्रिक अडचण आहे’ अशी कारणे सांगून १५०० रुपयांसारखी अल्प रक्कम देण्यासही नकार देत आहेत.

​तालुक्यातील ग्रामीण भागातून एसटी बसचे भाडे खर्च करून अनेक वृद्ध आणि गरजू व्यक्ती आशेने पोस्ट ऑफिसमध्ये येतात. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतरही केवळ नकार मिळत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. “खात्यात पैसे दिसत असूनही बँक का देत नाही?” असा सवाल संतप्त लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

​एकीकडे सरकार डिजिटल बँकिंगच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष व्यवहारात गरिबांची अडवणूक होत आहे. पोस्ट ऑफिसच्या या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून लाभार्थ्यांचे पैसे त्वरित देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. जर ही समस्या सुटली नाही, तर लाभार्थ्यांच्या वतीने आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

 

Popular Articles

error: Content is protected !!