Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

चंद्रपूर: जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे राबविण्यात येणाऱ्या “चांदा ज्योती सुपर 100” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये इयत्ता 10 वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना IIT/JEE/NEET या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षे मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत प्रथम चाळणी परीक्षा दि. 31 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रथम चाळणी परीक्षेत 40 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड परीक्षा दि. 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12.00 ते 2.30 या वेळेत भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, मुल रोड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत उपलब्ध राहणार असून प्रश्न इयत्ता 10 वीच्या बीजगणित (Algebra), भूमिती (Geometry) आणि विज्ञान (Science) या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम निवड परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!