Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

प्रशासनाचा धाक संपला? कोरपणात जादा दराने दूध विक्रीचा ‘धुमाकूळ ‘ सुरूच; कारवाई फक्त कागदावरच!

प्रशासनाचा धाक संपला? कोरपणात जादा दराने दूध विक्रीचा ‘धुमाकूळ ‘ सुरूच; कारवाई फक्त कागदावरच!

​वैध मापन शास्त्र विभागाच्या इशाऱ्याला दुकानदारा केराची टोपली; कुलिंग चार्जेसच्या नावाखाली ग्राहकांची खिसेकापू लूट कायम

​कोरपणा: ‘दुरुस्ती’ आणि ‘कारवाई’चे आश्वासन देऊनही कोरपणा शहरातील स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र समोर आले आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि शीतपेयांवर छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त पैसे घेण्याचा गोरखधंदा आजही शहरात बिनदिक्कतपणे सुरू आहे. वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर यांनी कारवाईचे संकेत देऊनही प्रत्यक्षात अद्याप कोणताही ठोस ‘दणका’ न बसल्याने दुकानदारांचे धाडस अधिकच वाढले आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, कोरपणातील बाजारपेठेत आजही चित्र बदललेले नाही.

​👉 दूध पिशवीवर १ ते २ रुपये जास्त: पिशवीवर छापलेल्या दरापेक्षा जादा पैसे घेतले जात आहेत.

​👉 शीतपेयांची ‘थंड’ लूट: फ्रीजमध्ये बाटली ठेवल्याच्या नावाखाली ५ ते १० रुपयांची सर्रास लूट सुरू आहे.

​👉 बिलाची टाळाटाळ: जादा पैसे घेतल्याचे बिल मागितले असता दुकानदार ग्राहकांशी हुज्जत घालत आहेत.

​प्रशासनाची ‘सुस्त’ भूमिका?

​वैध मापन शास्त्र विभागाने “आमची टीम चौकशी करणार” असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप एकही मोठी कारवाई किंवा दंड आकारल्याचे समोर आलेले नाही. प्रशासनाच्या या ‘थंडावलेल्या’ भूमिकेमुळे दुकानदारांना मोकळे रान मिळाले असून, सर्वसामान्य ग्राहकांना मात्र आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कायद्यानुसार एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तरीही कोरपणात हा प्रकार उघडपणे का सुरू आहे? असा सवाल आता ग्राहक विचारत आहेत.

​”आम्ही फक्त बातम्या वाचतोय, पण दुकानात गेल्यावर आजही जादा पैसेच मोजावे लागत आहेत. प्रशासनाचे पथक नेमके कुठे आहे?”

— संतप्त ग्राहक, कोरपणा

​आमचा पाठपुरावा सुरूच राहणार!

​ग्राहकांच्या हक्कासाठी आमची टीम या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. जोपर्यंत दोषी दुकानदारांवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही आणि सामान्यांची लूट थांबत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.

​आता तरी वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर आपली ‘सुस्ती’ झटकून कोरपणात धडक कारवाई करणार का? की ग्राहकांची अशीच लूट सुरू राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​ग्राहकांना आवाहन:

तुमच्याकडून जादा पैसे घेतले जात असल्यास, त्या व्यवहाराचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि स्थानिक तहसीलदार किंवा वैध मापन शास्त्र विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा. घाबरू नका, आपला हक्क बजावा!

Popular Articles

error: Content is protected !!