Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

महामानवाला अभिवादन: कोरपना येथे भीम जयंती निमित्त भव्य रॅली; सुहेल अली मित्र मंडळाकडून फळे व सरबत वाटप

महामानवाला अभिवादन: कोरपना येथे भीम जयंती निमित्त भव्य रॅली; सुहेल अली मित्र मंडळाकडून फळे व सरबत वाटप

​कोरपना:  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरपना शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बौद्ध विहार विकास मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले, तर सुहेल अली मित्र मंडळाने सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत रॅलीतील सहभागींना अल्पोपहार आणि सरबत वाटप केले.

​​रॅलीची सुरुवात शहरातील मुख्य शिवाजी चौक येथून करण्यात आली. यावेळी सुहेल अली मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. रॅलीमध्ये बौद्ध समाजासह सर्व धर्मीय बांधव, महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निळ्या ध्वजांनी आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

​कार्यक्रमादरम्यान डॉ. जिवने, मेश्राम सर आणि बाबाराव धोटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आबिद अली, नारायण हिवरकर, संदीप टोंगे, पावडे, अविनाश मुसळे, संभा भुसारी यांनी रॅलीचे स्वागत केले.

रॅलीमध्ये सहभागी झालेल्या जनसमुदायासाठी सुहेल अली मित्र मंडळाच्या वतीने पिण्याचे पाणी, ताजी फळे आणि थंडगार सरबत यांचे वाटप करण्यात आले. उन्हाचा तडाखा लक्षात घेता या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. “संविधानामुळे आज समाज ताठ मानेने उभा आहे आणि मानवता हाच खरा धर्म आहे,” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

​​या यशस्वी आयोजनासाठी सय्यद सुहेल अली, नदीम सय्यद, अबरार अली, शहेबाज अली, आदित्य मासिरकर, गौरव मेश्राम, शहेबाज बेग, अल्ताफ बेग, साजीद शेख, मजीद, जब्बार भाई, पवन बोरकर, शमशुद्दीन शेख, विजय जिवने, विजय भगत, पुंडलीक टोंगे, रोशन धगडी, प्रकाश कोहचाडे, आरीफ शेख, सोनु शेख, मोबिन बेग, सुरज येडे, नदीम अली, शारिक अली, प्रज्वल मरस्कोल्हे, स्वरूप पार्लेवर आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

​रॅलीचा समारोप स्थानिक बौद्ध विहार येथे अतिशय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आला.

Popular Articles

error: Content is protected !!