Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

केंद्र पुरस्कृत योजनांचा खासदारांकडून आढावा

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक

चंद्रपूर: केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांच्या प्रगतीचा लेखाजोखा घेण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचा (दिशा) आढावा आज (दि. 15) घेण्यात आला.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीला चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्ह्यातील नगराध्यक्ष, दिशा समितीचे अशासकीय सदस्य व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात बांधकामाधीन असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोडचे बांधकाम करणे आवश्यक आहे, जेणेकरून शेतक-यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी सोयीचे होईल, मात्र काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सर्व्हिस रोडचे बांधकाम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणने संबंधित कंत्राटदारास सक्त निर्देश देऊन सर्व्हिस रोडचे बांधकाम करून घ्यावे. ज्या भागात बीएसएनएलचे टॉवर बंद / रेंज नसेल तेथे अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ते आवश्यक गावात प्राधान्याने पूर्ण करावे. अंगणवाडीतून दर्जेदार पोषण आहार दिला गेला पाहिजे. अन्यथा नागरिकांना कुठे तक्रारी करावयाच्या याबाबत प्रत्येक अंगणवाडीमध्ये फलक लावावा.

वर्धा – बल्लारशहा रेल्वेच्या तिसरी लाईन संदर्भात स्थानिक यंत्रणेला विश्वासात घ्यावे. गावागावांमधील शेत पाणंद रस्ते अतिशय महत्वाचा विषय आहे, ते त्वरीत पूर्ण करावे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या लक्षात घेता महानगर पालिकेने पाणी पुरवठा योजनेचे योग्य नियोजन करावे. अमृत योजनेचे अतिशय संथगतीने आणि निकृष्ट काम करणा-या संबंधित कंत्राटदारावर मनपाने कारवाई करावी. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करावी. तसेच रस्त्याच्या बाजुला उभ्या असणा-या वाहनांवर सक्त कारवाई करावी. खाजगी शाळांमध्ये कोणत्याही शालेय साहित्याची विक्री नको. जी शाळा जबरदस्ती करीत असेल अशा संस्थांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

यावेळी आमदार देवराव भोंगळे, विविध नगर पालिकेचे नगराध्यक्ष आणि समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी तर संचालन जि.प. समाजकल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले.

या विषयांचा झाला आढावा : यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल – भारत नेट, प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण आणि शहरी प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन (शहरी आणि ग्रामीण), अमृत योजना, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी विमा योजना, मृदा आरोग्य कार्ड, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचा आढावा घेतला.

Popular Articles

error: Content is protected !!