युवकांचे पाऊल समाजकारणाकडे! गांधीनगर येथे भारतीय जनता युवा मोर्चाची नवी कार्यकारणी जाहीर.
कोरपना: तालुक्यातील गांधीनगर येथे भारतीय जनता युवा मोर्चाची (भाजयुमो) नवी कार्यकारणी नुकतीच उत्साहात गठीत करण्यात आली. राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या निर्देशानुसार आणि ‘गाव तिथे शाखा’ या संकल्पनेतून गांधीनगर (ता. कोरपना) येथील युवकांनी स्थानिक सभेचे आयोजन करून हा महत्त्वाचा निर्णय घेतला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी राजकारणात सक्रिय होऊन समाजकारण करावे, या उद्देशाने ही कार्यकारणी स्थापन करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम भाजप कोरपना तालुका अध्यक्ष संजयजी मुसळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मा. तनयजी देशकर, युवा नेतृत्व ओमजी पवार आणि भाजयुमो तालुका अध्यक्ष दिनेशजी खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी गांधीनगर-कोडशी बु. चे सरपंच उमेशजी कोल्हे, युवा नेतृत्व अंकुश कोल्हे आणि निलेश कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेमध्ये सर्वानुमते खालीलप्रमाणे नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली:
भाजयुमो गांधीनगर नवनियुक्त कार्यकारणी:
अध्यक्ष: श्री नितेश रामदास वासेकर उपाध्यक्ष: वामन बल्की, पवन चाटारे, जय पावडे सचिव: सुरज देविदास खाडे, शुभम गजानन चौधरी, मारुती चाटारे, रमजान सैय्यद सहसचिव: चेतन विठ्ठल राऊत, साहिल सैय्यद सोशल मीडिया संयोजक: पंकज ज्ञानेश्वर शिंदे, धीरज गणपत भोयर ओबीसी सेल अध्यक्ष: आदित्य मुरलीधर भोयर अनुसूचित जाती-जमाती (ST) अध्यक्ष: गणेश आत्राम
कार्यकारणी सदस्य: याप्रसंगी मारुती गुरनुले, बादल कोकिडे, रितिक वासेकर, रोशन भोयर, सुधीर पेटकर, ओमप्रकाश चाटारे, रोहित मासिरेकर, निखिल पेटकर, सौरभ भोयर, प्रज्ञेश पेटकर यांच्यासह गावातील असंख्य युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आमदार देवराव दादा भोंगळे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अभिनंदन केले असून, आगामी काळात गावाच्या विकासात ही युवा टीम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.





