Sunday, October 18, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका: ६५ अल्पवयीन चालकांची वाहने जप्त, पोलीस अधीक्षकांनी पालकांचे टोचले कान!

चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका: ६५ अल्पवयीन चालकांची वाहने जप्त, पोलीस अधीक्षकांनी पालकांचे टोचले कान!

​पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी दिली तर थेट तुरुंगाची हवा; चंद्रपूर पोलिसांचा कडक इशारा

​चंद्रपूर:

शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी मंगळवारी एक अत्यंत मोठी आणि धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक यांच्या थेट निर्देशानुसार शहरात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ६५ अल्पवयीन मुलांची वाहने जप्त (डिटेन) केली.

​या धडक कारवाईमुळे विनापरवाना सुसाट वाहने पळवणाऱ्या अल्पवयीन मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे धाबे दणाणले आहेत.

​पोलीस ठाण्यातच भरला ‘पालकांचा वर्ग’!

​या कारवाईनंतर आज सायंकाळी ५:०० वाजता जप्त केलेल्या सर्व ६५ मुलांच्या पालकांना वाहतूक शाखेत पाचारण करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व पालकांचे समुपदेशन केले आणि थेट शब्दांत गंभीर इशारा दिला.

​”अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणे हा केवळ कायद्याने गुन्हा नाही, तर तो मुलांच्या आणि निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसताना पालकांनी कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या हाती वाहन सोपू नये.”

— पोलीस प्रशासन, चंद्रपूर

​समुपदेशनानंतर पहिल्या वेळी समज देऊन ही सर्व जप्त केलेली वाहने पालकांच्या स्वाधीन करण्यात आली.

👉 ​पुढील वेळी थेट जेल आणि मोठा दंड; पोलिसांचा कडक इशारा!

​चंद्रपूर पोलीस दलाने स्पष्ट केले आहे की, ही मोहीम केवळ एक जनजागृती आणि चेतावणी होती. मात्र, यापुढे जर कोणतेही अल्पवयीन मूल रस्त्यावर वाहन चालवताना आढळल्यास, मोटार वाहन कायद्याच्या (Motor Vehicles Act) कडक कलमांन्वये थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. अल्पवयीन मुलाला गाडी दिल्यास थेट पालकांना किंवा वाहन मालकाला जबाबदार धरून गुन्हा दाखल केला जाईल.

कायद्यानुसार पालकांना २५,००० रुपयांपर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे.

​लायसन्स रद्द: संबंधित वाहनाची नोंदणी वर्षभरासाठी रद्द होऊ शकते, तसेच मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

​”आपल्या मुलांचे भविष्य आणि आयुष्य मौल्यवान आहे. त्यांना अल्पवयीन असताना वाहने देऊन त्यांचा जीव धोक्यात घालू नका. चंद्रपूर पोलिसांना शहर सुरक्षित व अपघातमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करा.”

— पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर

Popular Articles

error: Content is protected !!