Thursday, October 22, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम; आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपन्यात फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

 वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम; आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरपन्यात फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम

कोरपना |

राज्याचे ज्येष्ठ नेते व लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, कोरपना शहराच्या वतीने फळवाटप व वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दि. ३० जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे पार पडणार असून, रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात येणार आहे.

या उपक्रमात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपत सेवा, पर्यावरण संवर्धन आणि जनकल्याणाचा संदेश देणारा हा उपक्रम वाढदिवसाचे औचित्य साधून साजरा करण्यात येणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

Popular Articles

error: Content is protected !!