Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

ग्रामीण प्रश्नांचा बुलंद आवाज आता कामगारांच्या हक्कासाठी! योगेश मुऱ्हेकर शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे नवे जिल्हाप्रमुख 

ग्रामीण प्रश्नांचा बुलंद आवाज आता कामगारांच्या हक्कासाठी! योगेश मुऱ्हेकर शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे नवे जिल्हाप्रमुख 

​चंद्रपूर:

सामाजिक, ग्रामविकास आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या धडपडीने विशेष ओळख निर्माण करणारे योगेश मुऱ्हेकर यांची शिवसेना श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे अभ्यासू पत्रकार आणि ‘युवा शक्ती ग्राम विकास संघटने’चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असणाऱ्या मुऱ्हेकर यांच्यावर आता जिल्ह्यातील कामगारांच्या हक्कासाठी लढा देण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती झाली आहे. शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अमित आर. भटपार यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत नियुक्तीपत्र मुऱ्हेकर यांना प्रदान करण्यात आले.

योगेश मुऱ्हेकर यांच्या नियुक्तीमध्ये शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. मुऱ्हेकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता आणि ग्रामविकासातील योगदानाची दखल घेऊन हजारे यांनी या नियुक्तीसाठी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच मुऱ्हेकर यांच्यासारख्या अभ्यासू आणि सक्रिय नेतृत्वाकडे कामगार संघटनेचे जिल्हास्तरीय नेतृत्व आले आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना नेहमीच न्याय देणारे मुऱ्हेकर आता संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कामगारांची संघटित मुठ बांधणे, त्यांच्या विविध समस्या समजून घेऊन त्या धसास लावणे आणि संघटनेची भक्कम बांधणी करणे हे त्यांच्यासमोरील प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

​योगेश मुऱ्हेकर यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच जिल्ह्यातील शिवसैनिक, कामगार, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवाराकडून आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदनाचा जोरदार वर्षाव होत आहे.

Popular Articles