Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

​🎨🔬 उत्साहपूर्ण वातावरणात ‘स्कॉलर्स सर्च अकॅडमी’ येथे विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन उत्साहात संपन्न!

​🎨🔬 उत्साहपूर्ण वातावरणात ‘स्कॉलर्स सर्च अकॅडमी’ येथे विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन उत्साहात संपन्न!

कोरपना: दि. 22/11/2025 रोजी ‘स्कॉलर्स सर्च अकॅडमी’ कोरपना येथे आयोजित करण्यात आलेले विज्ञान आणि चित्रकला प्रदर्शन (Science and Art Exhibition) अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देणाऱ्या या प्रदर्शनामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

संस्थापक इंजी. दिलीप झाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य राहुल उलमाले, प्राथमिक विभाग प्रमुख संतोष जेनेकर, ज्यु कॉलेज प्रभारी कु. प्रणाली खडसे आणि सरिका धोंगले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात पारंपरिक व आधुनिक शेती तंत्र, पाणी संवर्धन, पवन व सौर ऊर्जा निर्मिती, हवेचे रॉकेट, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू, मिक्सर–कूलर मॉडेल, फुफ्फुस कार्य यंत्र, चुंबकाचे गुणधर्म, जंगली–पाळीव प्राणी, मातीचे उपयोग, आकाशगंगा अशा विविध प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना माहिती दिली.

यासोबतच विद्यार्थ्यांनी रांगोळी प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन मध्येही आपली उत्कृष्ट कला सादर केली. विशेष म्हणजे, दोन्हीही प्रदर्शन विज्ञानाधारित संकल्पनांवर आधारित असून विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयांचे सुंदर कलात्मक रूपांतर मांडले. आकर्षक विज्ञान-रांगोळ्या आणि विज्ञान विषयांवरील चित्रकृतींना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्राचार्य राहुल उलमाले यांनी सर्व विज्ञान प्रयोग तसेच विज्ञानाधारित कला प्रदर्शनांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, संपूर्ण महोत्सवाचे यशस्वी नियोजन प्रशंसनीय ठरले व त्यांच्या कार्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छबन पेरके, दिव्या शेंडे, तनुजा टोंगे, प्रिती बुटले, उज्वला वडस्कर, नेहरिका हंसकर, भावना मोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Popular Articles