एसटीचा प्रवास आता ‘स्मार्ट’! कागदपत्रांच्या कटकटीतून सुटका, ‘वन नेशन, वन कार्ड’ सुविधेचा असा घ्या लाभ!
कोरपना: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘एक देश, एक कार्ड’ या संकल्पनेवर आधारित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सुविधेची अंमलबजावणी आता सुरू झाली असून, कोरपना येथील टेंभुर्डे ऑनलाईन सेंटर येथे या कार्डसाठीची नोंदणी प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून एक ‘डिजिटल वॉलेट’ आहे. यामुळे सवलतधारक प्रवाशांना आता प्रवासादरम्यान कागदपत्रांचा ढिगारा सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही. बसमध्ये कंडक्टरच्या मशीनवर कार्ड टॅप करताच तुमची सवलत आपोआप लागू होईल.
एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ आता एका क्लिकवर मिळणार आहे:
👉 महिला सन्मान योजना: तिकीट दरात ५०% सवलत.
👉 ज्येष्ठ नागरिक (६२ ते ७५ वर्षे): तिकीट दरात ५०% सवलत.
👉 अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवरील): एसटीने १००% मोफत प्रवास.
👉 विद्यार्थी: शैक्षणिक पास धारकांसाठी प्रवासाचा सोपा मार्ग.
👉दिव्यांग व दृष्टीहीन: शासनाच्या नियमानुसार विशेष सवलती लागू.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. केंद्रावर येताना खालील गोष्टी सोबत ठेवा:मूळ आधार कार्ड (Original Aadhaar Card),चालू मोबाईल क्रमांक
महत्वाची टीप: हे कार्ड एकदा काढल्यानंतर तुम्हाला कंडक्टरकडे वारंवार कागदी ओळखपत्र दाखवण्याची कटकट राहणार नाही. यामुळे वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सुखकर होईल.
आजच नोंदणी करा!
तुमच्या हक्काच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि हायटेक प्रवासासाठी आजच संपर्क साधा:
👉 टेंभुर्डे ऑनलाईन सेंटर, कोरपना 👈
(सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म्स आधार कार्ड सेवा आणि शासकीय योजनांच्या विश्वसनीय माहितीसाठी हक्काचे ठिकाण)
तुमचा प्रवास, आमची जबाबदारी!






