Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

वाळू माफियांना धडकी भरणार! ‘सिंडिकेट’ उध्वस्त करणारे ‘धडाकेबाज’ आयपीएस आयुष नोपानी चंद्रपूरचे नवे SP

वाळू माफियांना धडकी भरणार! ‘सिंडिकेट’ उध्वस्त करणारे ‘धडाकेबाज’ आयपीएस आयुष नोपानी चंद्रपूरचे नवे SP

​चंद्रपूर: जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल झाले असून, आपल्या कर्तव्यदक्षतेने वाळू माफियांमध्ये दहशत निर्माण करणारे आयपीएस अधिकारी आयुष नोपानी यांनी चंद्रपूरचे नवे पोलीस अधीक्षक (SP) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. गृह विभागाने ३० एप्रिल रोजी राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, त्यानुसार मुमक्का सुदर्शन यांची बदली अहिल्यानगर येथे करण्यात आली आहे.

​ओळखीचेच ‘मैदान’, पण आव्हाने नवी!

​आयुष नोपानी हे चंद्रपूर जिल्ह्यासाठी नवीन नाव नाही. यापूर्वी त्यांनी वरोरा उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करताना वाळू माफियांचे कंबरडे मोडले होते. वाळू तस्करीचे मोठे सिंडिकेट उध्वस्त करण्याचा त्यांचा अनुभव पाहता, त्यांच्या नियुक्तीमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

​नव्या SP समोर ‘या’ आव्हानांचा डोंगर:

​👉 वाळू तस्करीला लगाम: सध्या कोरपणा तालुक्यातील तीन घाटांचा लिलाव झाला असला तरी, ‘कारवाही-१’ सारख्या घाटांमध्ये थेट पोकलेन (PC) मशीन लावून अवैध उत्खनन सुरू असल्याचे चित्र आहे. या ‘मशीन माफिया’च्या मुसक्या आवळणे हे नोपानी यांच्यापुढील पहिले मोठे आव्हान असेल.

​👉 वाढती गुन्हेगारी मोडीत काढणे: मागील काही काळात जिल्ह्यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण करून गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे.

​👉 अवैध धंद्यांचे जाळे: कोळसा तस्करी, अवैध दारू विक्री आणि रेती तस्करांचे जाळे तोडून सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याची मोठी जबाबदारी नव्या अधीक्षकांवर आहे.

​”ज्या अधिकाऱ्याने वरोऱ्यात वाळू माफियांचे सिंडिकेट उध्वस्त केले, तेच आता संपूर्ण जिल्ह्याची कमान सांभाळणार असल्याने, चंद्रपुरात पुन्हा एकदा ‘खाकी’चा दरारा पाहायला मिळेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.”

​चंद्रपूरच्या विकासाला आणि शांततेत अडथळा ठरणाऱ्या समाजकंटकांवर आता ‘नोपानी स्ट्राईक’ होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles