Friday, October 16, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

क्रीडा संकुलाची नवीन भिंत कोसळली, मोठा भ्रष्टाचार उघडकीस?

क्रीडा संकुलाची नवीन भिंत कोसळली, मोठा भ्रष्टाचार उघडकीस?

कोरपना: शहरात नुकत्याच उभारलेल्या क्रीडा संकुलाची एक मोठी संरक्षक भिंत दि. 18/04/25 ला संध्याकाळच्या सुमारास  अचानक कोसळली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील  कोट्यावधी रुपये खर्चून हे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे.  मात्र,काल दुपारी अचानक संकुलाच्या एका बाजूची नव्याने बांधलेली मोठी भिंत जोरदार आवाजाने खाली कोसळली. सुदैवाने त्यावेळी भिंतीजवळ कोणी नसल्याने जीवितहानी टळली आहे, परंतु या दुर्घटनेमुळे संकुलाचे मोठे नुकसान झाले आहे.

भिंत कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि कामात झालेला भ्रष्टाचार यामुळेच ही भिंत कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक नागरिकांनी या बांधकामातील अनियमितता आणि वापरलेल्या हलक्या दर्जाच्या साहित्याबद्दल यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे.

या दुर्घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

या संदर्भात बोलताना काही जागरूक नागरिकांनी सांगितले की, “या क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केला आहे, हे आता स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.”

नागरिकांमधील संताप अजूनही कायम आहे. कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या क्रीडा संकुलाची भिंत  कोसळल्याने  प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!