कोरपना येथे भव्य महाआरोग्य शिबिरातील रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे रवाना
कोरपना:
कोरपना येथे नुकतेच भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यात विविध आजारांची तपासणी करून अनेक गरजू रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. ११९९ जणांची तपासणी झाली असून त्यापैकी४१२ रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे,शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही रुग्णांना गंभीर आजाराचे निदान झाले असून, त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले.
त्यानुसार, अशा रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी रुग्णालय , येथे रवाना करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे अनेकांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळणार असून, त्यांचे आरोग्य सुधारण्यास निश्चितच मदत होईल.
शिबिराच्या आयोजनासाठी तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, स्टुडन्ट फोरम ग्रुप ,आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थांचा मोलाचा सहभाग लाभला. आयोजकांनी रुग्णांच्या पुढील उपचारासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक सोयीसुविधांची काळजी घेतली जाणार असे आश्वासन राजुरा विधानसभा क्षेत्राची लोकप्रिय आमदार देवराव दादा भोंगळे यांनी दिले आहे, सदर भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन श्री देवराव दादा भोंगळे यांनी केले होते,
पुढील शस्त्रक्रिया साठी रुग्णाला रवाना करतेवेळी कोरपणा शहराध्यक्ष अमोल आसेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,
महिला तालुकाध्यक्ष जोस्तनाताई वैरागडे , महिला शहराध्यक्ष अल्का ताई रणदिवे, नगरसेविका वर्षाताई लांडगे ,अबरार अली ,सुनील दरेकर , विजय पानघाटे,युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन बुरेवार, दिनेश ढेंगडे, शैलेश परसुटकर , दिनेश सूर, जितेंद्र पिंपळकर, शंकर चिंतलवार, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,






