Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

प्रत्येक बुधवारला महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनीक

प्रत्येक बुधवारला महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनीक

चंद्रपूर, दि. 30 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणे, विशेषत: रजोनिवृत्ती कालावधीत महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व हार्मोनल बदलावर योग्य वेळी वैद्यकीय उपचार, तपासणी व समुपदेशन उपलब्ध करून देण्याकरीता 14 जानेवारी 2026 मकर संक्रांतीचे औचित्य साधून राज्यभरात रजोनिवृत्ती (मेनोपाज)  क्लिनिक सुरू करण्यात आले.

सदर योजनेच्या प्रभावी सुसूत्र अंमलबजावणी करण्याकरीता खालील पद्धतीने निर्देश देण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय, ज्या ठिकाणी  स्त्रीरोगतज्ञ उपलब्ध आहे, अशा ठिकाणी यापद्धतीचे विशेष क्लिनिक सुरू करण्यात आले आहे,  चंद्रपूर जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालय वरोरा, चिमूर राजुरा, मुल, ब्रह्मपुरी व बल्लारपूर या ठिकाणी प्रामुख्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे, या क्लिनिकमध्ये आठवड्यातून एक दिवस म्हणजे प्रत्येक बुधवारी मेनोपाज ओपीडी सुरू करण्यात आली आहे.

यात स्त्रीरोग तज्ञाकडून तपासणी, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, औषधोपचार, आहार व जीवनशैली विषयक मार्गदर्शन आणि मानसिक आरोग्य विषयक समुपदेशन करण्यात येत आहे. करिता महिलांनी  प्रामुख्याने 45 ते 50 वयोगटातील महिलांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे

Popular Articles

error: Content is protected !!