कोरपना तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. श्रीनिवास मुसळे; नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर!
कोरपना: तालुका बार असोसिएशन, कोरपनाची वार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून, आगामी कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. श्रीनिवास मुसळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या नवनियुक्त कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी ॲड. दीपांजली मंथनवार, सचिवपदी ॲड. पवार, तर सहसचिव म्हणून ॲड. मेघा धामोरीकर यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी कोषाध्यक्ष म्हणून ॲड. जुबेर शेख सांभाळतील. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. कृपाल कोल्हे आणि ॲड. पल्लवी कडुकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वकिलांच्या हितासाठी आणि न्यायालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी ही नवनियुक्त टीम कटिबद्ध राहील, असा विश्वास नवनियुक्त अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल तालुक्यातील वकील बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






