डाक जीवन विमा योजना एजंटकरीता अर्ज आमंत्रित
चंद्रपूर: भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेअंतर्गत अभिकर्ता (एजंट) यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना डाक अधीक्षक चंद्रपुर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे
एजंटकरीता पात्रता : 1) उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे. 2) शैक्षणिक पात्रता किमान १० वी पास. 3) बेरोजगारीत किंवा स्वयम रोजगारीत शिक्षित युवा, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपनीचे माजी एजेंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका, सेवा निवृत शिक्षक इत्यादी. 4) उमेदवार दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीचा सद्यस्थितीत एजेंट नसावा. 5) उमेदवाराची निवड थेट मुलाखती द्वारे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य, जीवन विम्याबाबत चे ज्ञानाच्या आधारावर केली जाईल. 6) निवड झालेल्या उमेदवारास 5 हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. 7) प्रशिक्षण पूर्तता नंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना देण्यात येईल जो आयआरडीए ची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायमच्या परवान्यामध्ये रुपांतरीत केल्या जाईल. 8 ) निवड झालेल्या उमेदवारास टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय, चंद्रपुर विभाग, चंद्रपुर येथे विहित नमुन्यातील अर्ज आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड व अन्य संबंधित दस्तावेज 10 वी किंवा 12 वी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्रासह (असल्यास) 27 ऑक्टोबर 2026 ला सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयास संपर्क साधावा किंवा आमच्या www.maharashtrapost.gov.in वेब साईटला भेट द्यावी, असे वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी कळविले आहे.



