Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

जात निहाय जनगणना विधायक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

जात निहाय जनगणना विधायक मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरपना येथे भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोरपना :- केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्यासंदर्भात विधायक मंजूर केल्यामुळे देशभरातून विविध समाज घटकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या न्यायासाठी या निर्णयाचे स्वागत होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने सामाजिक समावेश आणि योजना आखणी अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संघटनांनी आणि राजकीय नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी या विधायकाच्या मंजुरीत नेतृत्व दाखवले आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.

या निर्णयामुळे देशात पहिल्यांदाच जातीनिहाय आकडेवारी अधिकृत स्वरूपात उपलब्ध होणार असून, विविध योजनांचा लाभ बरोबरीने मिळवून देण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र कोरपणा येथे फटाक्याची आतिशबाजी व घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करण्यात आला आहे,

यावेळी तालुका अध्यक्ष संजय मुसळे , तालुका महामंत्री सतीश उपलंचीववार, शहराध्यक्ष अमोल आसेकर,तालुका महामंत्री प्रमोद कोडापे, जिल्हा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण मडावी , महिला तालुका महामंत्री ॲड दिपाली मंथनवार , ॲड पवन मोहितकर ,तालुका उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोंगळे, अबरार अली, विजय पानघाटे,संगीता चिंतलवार लक्ष्मी कुळमेथे , अशोक झाडे , महिला शहर अध्यक्ष अलकाताई रणदिवे नगरसेविका वर्षाताई लांडगे गीता ताई डोहे , युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश खडसे , धम्म कीर्ती कापसे,पुंडलिक उलमाले,युवा मोर्चा शहराध्यक्ष पवन बुरेवार , शहराध्यक्ष संजय नीत, मोहब्बत खान,मनोज तुमराम , शहर महामंत्री रवी बंडीवार , तालुका किसान आघाडी अध्यक्ष संजय पिंपळशेंडे , कवडू जरीले,मनोहर चव्हाण , हरबाजी झाडे,नागोराव आत्राम ,अनिल ढवस , जितेंद्र पिंपळकर,रामदास कुंमरे ,बाबाराव राऊत, राम स्वामी चंद्र गिरी, शंकर चिंतलवार आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Popular Articles

error: Content is protected !!