कोरपना शहरात पाणी टंचाईवर मात करण्याकरिता 20 लक्ष निधी मंजूर
आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या पाठपुराव्याला यश
कोरपना: शहरामध्ये पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली असून यावर्षी प्रत्येकाच्या घरातील बोरवेल कोरडे पडल्याने शहरात सध्या टँकर द्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यावर मात करण्यासाठी आमदार देवराव दादा भोंगळे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून शहरांमध्ये बोरवेल्स करिता 20 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे .
कोरपणा हे तालुक्याचे ठिकाण असताना सुद्धा येथे नळ योजना नसल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याने दरवर्षी टँकर द्वारा पाणी पुरवठा केला जात असतो त्यामुळे नगरपंचायत ला बराच आर्थिक फटका बसत असतो. याकरिता नळ योजनेसाठी शासन स्तरावर आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून लवकरच कोरपणा शहरांमध्ये नळयोजना सुद्धा मंजूर होणार आहे.
सध्या स्थितीत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बोरवेल्स करिता दलित्तर निधी अंतर्गत 20 लक्ष रुपयाचा निधी आमदार देवराव दादा भोंगळे यांच्या पाठपुराव्यानंतर नगरपंचायत ला निधी प्राप्त झाला असून लवकरच आवश्यक त्या ठिकाणी बोरवेल मारल्या जातील यामुळे पाणी टंचाईवर मात केला जाईल यामुळे आमदार देवराव दादा भोंगळे यांचे कोरपणा शहर वासियांच्या वतीने आभार व्यक्त केल्या जात आहे.






