Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

 2 ते 20 जून या कालावधीत विशेष कुष्ठरोग शोध अभियान

 2 ते 20 जून या कालावधीत विशेष कुष्ठरोग शोध अभियान

चंद्रपूर,दि. 2 जून : भारत सरकारने कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता सर्व राज्यांना त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याकरीता “जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा” तयार करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. चंद्रपर जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनात “जिल्हा धोरणात्मक कृती आराखडा” तयार करण्यात आला. जिल्ह्यात नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण शुन्यावर आणण्याकरीता सन 2023 ते 2027 या चार वर्षाच्या कालावधीत दर तीन महिन्यांनी विशेष कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

यातील तिसरी फेरी 2 जुन ते 20 जुन 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तसेच राजुरा तालुक्यातील कुष्ठरोगाकरीता संवेदनशील असलेल्या 20 गावात पिपल्स लेप्रा फाउंडेशन, हैद्राबाद या एन.जी.ओ. मार्फत सर्व्हेक्षण राबविण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रात कुष्ठरोगासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारी ही पहिली मोहीम ठरली.

सदर मोहीम 347 गावात राबविण्यात येणार असून मोहिमेदरम्यान 480 टीम मार्फत 1 लक्ष 39 हजार 198 घरांना भेटी देण्यात येईल. यात 5 लक्ष 80 हजार 924 नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहे. सदर टीम घरांमधील सर्व सभासदांची कुष्ठरोग आजारासाठी शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये त्वचेवर फिकट / लालसर बधीर च‌ट्टा, त्याठीकाणी घाम न येणे, जाड बधिर तेलकट /चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासुन किंवा पाय घोटयापासुन लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जानवणे, हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालताना पायातुन चप्पल पडणे, इत्यादी.

विशेष कुष्ठरोग शोध मोहीमेत 347 गावातील सर्व नागरीकांनी टीम मार्फत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मीना साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!