Saturday, October 24, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

BSNL ची नेटवर्क सेवा ‘कोमात’

BSNL ची नेटवर्क सेवा ‘कोमात’

कोरपना येथे बीएसएनएल सिम ठरत आहे निकामी

कोरपना:कोरपना हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, बँका, पतसंस्था तसेच व्यापारी बाजारपेठ असूनही बीएसएनएल ग्राहकांना मोबाईल नेटवर्कसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बीएसएनएलची सिम वापरणारे ग्राहक सतत ‘नो सिग्नल’ किंवा ‘नेटवर्क नॉट अव्हेलेबल’च्या समस्येला सामोरे जात असून सिम अक्षरशः निकामी ठरत आहे.

विशेष म्हणजे कोरपना शहरात बीएसएनएलची मोठी तांत्रिक यंत्रणा उपलब्ध असूनही त्याचा लाभ स्थानिक ग्राहकांना मिळताना दिसत नाही. यामुळे शासकीय कार्यालयातील बीएसएनएलच्या मोबाईल नंबरचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते सामान्य ग्राहकांपर्यंत सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ऑनलाईन व्यवहार, बँकिंग सेवा, महत्त्वाचे कॉल्स व ओटीपी सारख्या सेवांमध्ये सातत्याने अडथळा येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. बीएसएनएल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोरपना येथील नागरिक व ग्राहकांकडून होत आहे

Popular Articles

error: Content is protected !!