Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

पीक कर्ज वाटपाच्या सुलभतेसाठी नागरी मदत केंद्र

पीक कर्ज वाटपाच्या सुलभतेसाठी नागरी मदत केंद्र

तालुक्यातील शेतक-यांनी संपर्क करण्याचे चंद्रपूर तहसीलदारांचे आवाहन

चंद्रपूर,दि. 18 : जिल्ह्यात खरीप हंगाम – 2025 मध्ये कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहु नये, या उद्देशाने 16 ते 22 जून या कालावधीत पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने शेतक-यांची गैरसोय टाळण्याकरीता चंद्रपूर तहसील कार्यालयाचे मदत क्रमांक सह. निबंधक ए.आर तुपट (मो. 8530811366) आणि 7522900846 या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँक आणि संलग्न विभाग यांच्या समन्वयाने प्रत्येक बँकेत 16 ते 22 जून या कालावधीत रोज सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत कर्ज वाटप कॅम्पचे नियोजन करण्यांत आले आहे. त्याकरीता तालुक्यातील तसेच मेळाव्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी महसुल अधिकारी, कृषी अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, आणि सहकार विभागाचे (बैंक) क्षेत्रीय अधिकारी यांच्या नोडल म्हणुन नेमणूका करण्यात आल्या आहेत.

पीक कर्ज घेण्याकरीता शेतकऱ्यांनी सोबत- 7/12, 8अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 रंगीत पासपोर्ट फोटो, बँक पासबुक प्रत, कर्ज नसल्याचे (ना हरकत) प्रमापणपत्र आणि स्वंयघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याकरीता व मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वितरीत करण्याकरीता चंद्रपूर तहसील कार्यालयाकडून नागरी मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर तालुक्यातील शेतक-यांनी वर नमुद क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.

Popular Articles