Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

तुमच्या कुटुंबाचे सिकलसेल स्टेटस तपासले का ?

तुमच्या कुटुंबाचे सिकलसेल स्टेटस तपासले का ?

चंद्रपूर,दि. 1 : सिकलसेल आजारासंबंधीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे, आजाराचा संपूर्ण नायनाट व्हावा, महाराष्ट्र सिकलसेल मुक्त व्हावे, तसेच या आजाराच्या विळख्यातून सर्वांची सुटका व्हावी, या उद्देशाने सिकलसेल जनजागृ‌ती पंधरवडा राबविण्यात येत आहे.

सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. तो आई-वडिलांकडून मुलांकडे येतो. आपल्या मुलांना हा वारसा मिळू नये, असे वाटत असेल तर प्रथम आई-वडिलांनी आपण सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर किंवा पिडीतग्रस्त तर नाही ना, हे जाणून घ्यायला पाहिजे. आनुवंशिक गुणसूत्राने येणारा हा आजार रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होतो. या आजारात हिमोग्लोबिन मधील ग्लोबिन हे अबनॉर्मल असते. त्यामुळे तांबड्या पेशी तयार होताना. त्या विकृत म्हणजेच डिफेक्टिव्ह तयार होतात.

या विकृत तांबड्या पेशीची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे या पेशी शरीराला प्राणवायुचा पुरवठा योग्य प्रकारे करू शकत नाहीत. याला सिकलसेल पिडीतग्रस्त असे म्हणतात. त्यामुळेच या आजाराची सर्व लक्षणे दिसतात. हा आजार आई-वडील दोघेही सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर असल्यामुळे 25 टक्के मुले पिडीतग्रस्त होतात. या आजारासाठी रक्त घेतल्यामुळे हिपेटायटिस किंवा एचआयव्हीसारखे आजार होतात आणि लोहाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम दिसून येतात व त्यामुळे मृत्यु होण्याची शक्यता असते.

आई-वडिलांनी मुलाला जन्म देण्यापूर्वी ही तपासणी करणे गरजेचे आहे. ही रक्ताची साधी सोपी सरळ टेस्ट आहे. त्यालाच HPLC किंवा हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमैटोग्राफी असे म्हणतात, ही तपासणी आयुष्यात एकदाच करावयाची आहे. 1 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तीने आवर्जुन तपासणी करून घ्यावी. चंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकिय प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय स्तरावर मोफत HPLC तपासणी होते. चंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत नियमित मोफत औषधोपचार व जिल्हा रुग्णालय स्तरावर रक्तसंक्रमण केले जाते. कोणताही सिकलसेल रुग्ण औषध उपचारापासून वंचित राहू नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत मुबलक फॉलिक ऍसिड व हायड्राक्सियूरिया औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेतल्यास रुग्णांना होणारा त्रास कमी होऊन आयुष्यमान वाढण्यास मदत होते. या रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर स्वतः व आपल्या कुटुंबाचे सिकलसेल तपासून घ्या. टेस्टमध्ये आपण सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर निघालो तर …

👉 1. विवाह करताना आपल्या पार्टनरची HPLC ही तपासणी करून घ्यावी.

👉 2. डॉक्टरांकडे गेल्यावर तुम्ही सिकलसेल वाहक म्हणजेच कॅरिअर आहोत हे सांगणे आवश्यक

👉 3. गर्भवती महिलांची पहिल्या खेपेच्या तीन महिन्याच्या आत ही टेस्ट करून घेणे.

या आजाराबाबत समाजात असलेले गैरसमज, अंधश्रध्दा दूर करून या आजाराची अचूक माहिती जनसामान्य लोकांपर्यत पोहचविणे आवश्यक आहे. हे एकट्या आरोग्य विभागाचेच कार्य नाही तर या आजाराच्या निर्मूलनासाठी सेवाभावी सामाजिक संस्थांनी लोकचळवळ निर्माण करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!