Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

मुख्याध्यापक पी. बी. बोंडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम थाटात संपन्न

मुख्याध्यापक पी. बी. बोंडे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम थाटात संपन्न

कोरपना: ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, कोरपना संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोरपना येथील मुख्याध्यापक व प्राचार्य पी. बी. बोंडे यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ निष्ठेने व कर्तव्यपरायणतेने सेवा बजावलेल्या प्राचार्य बोंडे यांचा हा निरोप समारंभ भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच व संस्थेचे सचिव भाऊराव कारेकर, उपाध्यक्ष रमाकांत मालेकर, सहसचिव प्रा. अरुण कुकडे, संचालक गणेश गोडे, विलास बोरडे, सुभाष जोगी, सतीश झाडे, अरविंद कारेकर, तुळशीराम डोहे, पत्रकार जयंत जेनेकर, मनोज गोरे, मोहब्बत खान, नवनियुक्त प्राचार्य शेषराव मन्ने, पर्यवेक्षक के. डी. घुगुल आदी मान्यवर उपस्थित होते.

समारंभात मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य बोंडे यांच्या सेवाभावी कार्याचा विशेष उल्लेख केला. विद्यालयाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक उपक्रमांची उजळणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे, शिक्षकांना प्रेरक वातावरण मिळावे यासाठी सहकार्य करणारे आणि संस्थेच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे प्राचार्य म्हणून बोंडे यांची ओळख असल्याचे वक्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन विनोद पंदाम यांनी केले तर आभार राहुल मेश्राम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक मनोहर बांबोडे, एम. डी. खुसपूरे, एल. जी. आडे, रमेश येलपुलवार, विनोद पंदाम, प्रिया कारेकर, विद्यालयातील शिक्षक पी. के. ढेंगळे, ए. डी. सातपुते, के. एस. बोबडे, आर. व्ही. डाळ, एस. एस. काळे, सुप्रिया मालेकर, सीमा मालेकर, प्रज्योत आवारी, विलास धोटे, राजू लांडगे, एम. डी. खवसे, उदय डाखरे आदींनी परिश्रम घेतले.

या निरोप समारंभाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य बोंडे यांच्या कार्याचा गौरव करताना अनेकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू दिसून आले.

Popular Articles

error: Content is protected !!