Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

आर.टी.ई. (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; १० मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी!

आर.टी.ई. (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; १० मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी!

कोरपना पंचायत समितीचे आवाहन: आर.टी.ई. अर्जासाठी ‘गुगल लोकेशन’ तपासूनच फॉर्म भरा.

कोरपना: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आर.टी.ई. (RTE) २५% अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि पालकांची गैरसोय टाळावी यासाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कोरपना यांनी पालकांसाठी महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे.

​अर्ज भरताना घ्यावयाची खबरदारी: पालकांनी अर्ज भरताना आपल्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि Google Location (Latitude-Longitude) पुन्हा पुन्हा तपासून पाहावे. चुकीच्या लोकेशनमुळे पाल्याला जवळच्या शाळा मिळण्यात अडचण येऊ शकते. अर्जात जन्मदाखल्यावरीलच जन्मतारीख नोंदवावी, कारण एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही.

​महत्वाचे बदल आणि नियम:​ निवासी पुरावा: यावर्षी निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य धरले जाणार नाही. बँक पासबुक द्यायचे असल्यास ते केवळ राष्ट्रीयकृत बँकेचेच असावे.

​शाळांचे अंतर: यावर्षी केवळ १ किमी अंतरापर्यंतच्या शाळा निवडीसाठी उपलब्ध होतील.

​एकच अर्ज भरा: एकाच पाल्याचे दोन अर्ज (Duplicate) भरल्यास दोन्ही अर्ज बाद होतील. अर्ज चुकला असल्यास जुना अर्ज ‘डिलीट’ करूनच नवीन अर्ज भरावा.

​दिव्यांग बालके: ४०% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. जन्मतारखेबाबत तांत्रिक अडचण आल्यास rtemah2020@gmail.com वर त्वरित ईमेल करावा.

​अंतिम मुदत आणि तांत्रिक अडथळे: ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत १० मार्च २०२६ पर्यंत आहे. सर्व्हरवर ताण आल्यास पोर्टल स्लो होऊ शकते, अशा वेळी पालकांनी घाबरून न जाता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत, अर्ज क्रमांक आणि पासवर्ड सुरक्षित ठेवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

​”पालकांनी घाई न करता सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच अर्ज सबमिट करावा. खोटी माहिती आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो, याची नोंद घ्यावी.”

— गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कोरपना

Popular Articles