Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांची गुरुकुल महाविद्यालयात जयंती साजरी

स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा यांची गुरुकुल महाविद्यालयात जयंती साजरी

​अंधश्रद्धा निर्मूलन व शिक्षणाचे महत्त्व काळाची गरज – डॉ. अनिल मुसळे

​नांदा फाटा: येथील गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा जागर करत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे उपस्थित होते.

​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व वंदन करून करण्यात आली. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा. आशिष पैनकर आणि ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “संत गाडगेबाबा केवळ परिसर स्वच्छ करत नसत, तर ते आपल्या कीर्तनाद्वारे लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि कुप्रथांची घाण साफ करत असत. स्त्री भ्रूणहत्या रोखणे आणि शिक्षणाचे महत्त्व समजून सांगणे हा त्यांच्या कार्याचा मूळ गाभा होता.”

प्रास्ताविक करताना प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. “या महापुरुषांचे कार्य इतके अफाट होते की, आज राज्यातील मोठ्या विद्यापीठांना त्यांची नावे देऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपला जात आहे,” असे उद्गार त्यांनी काढले.

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. आशिष पैनकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त परिश्रम घेतले.

Popular Articles