Saturday, June 13, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार

वन अकादमीकडून कौशल्य विकास प्रशिक्षणातून शाश्वत रोजगार

चंद्रपूर: वन्यजीव परिक्षेत्रातील वन संसाधनांवरील अवलंबित्व कमी करून बेरोजगार युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर वन अकादमीतर्फे व्यापक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

या उपक्रमाचा मुख्य हेतू वन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा आहे. गेल्या तीन वर्षांपासून संचालक एम. एस. श्रीनिवास यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना उद्योगसापेक्ष कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान आणि आत्मविश्वास दिला जात आहे. विशेषतः ग्रामीण व वन क्षेत्रातील युवकांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासही मदत होत आहे. वन परिसरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन वन संसाधनांवरील अवलंबित्व कमी करण्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला आहे.

मार्च महिन्यात तीन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. यात 1) इलेक्ट्रिकल व सोलर पीव्ही इंस्टॉलर कोर्समध्ये इलेक्ट्रिकल मूलतत्त्वे तसेच सोलर पॅनल बसविणे व देखभाल यांचे प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून 20 युवकांना नोकरी मिळाली असून त्यांना 18200 रुपये प्रतिमाह वेतनासह निवास व भोजन सुविधा देण्यात येत आहे.

2) ऑटोमोटिव्ह 4-व्हीलर असिस्टंट या प्रशिक्षणामध्ये वाहनांचे भाग, सर्व्हिसिंग व देखभाल याबाबत ज्ञान देण्यात आले. प्रशिक्षित युवकांपैकी काहींना पुणे (भारत बेंझ – चाकण), मालेगाव, नागपूर (गिरनार आयशर) तसेच इरोस हुंडाई येथे 14 ते 15 हजार रुपये प्रतिमाह वेतनावर नोकऱ्या मिळाल्या आहेत. 3) मल्टीफंक्शनल ऑफिस असोसिएट या कोर्समध्ये संगणक, संवाद कौशल्ये व कार्यालयीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. 29 प्रशिक्षित युवकांना गोवा, मुंबई, पुणे व चंद्रपूर येथील विविध नामांकित संस्था, मॉल व रुग्णालयांमध्ये 10 हजार ते 19 हजार रुपये प्रतिमाह वेतनावर रोजगार मिळाला आहे.

अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण, वैयक्तिक मार्गदर्शन व कामाचा अनुभव दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. या उपक्रमामुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळत आहे.

Popular Articles