Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कोरपना पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेली जाणारी ८ गोवंशीय जनावरे जप्त

कोरपना पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेली जाणारी ८ गोवंशीय जनावरे जप्त

​एका आरोपीला अटक, ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

​कोरपना: तालुक्यातील मौजा पार्डी येथे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचून गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत ८ जनावरांची सुटका करण्यात आली असून, २ लाख ५० हजार रुपये किमतीच्या वाहनासह एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास कोरपना पोलीस स्टेशनला ‘डायल ११२’ वरून माहिती मिळाली की, पार्डी येथे जनावरांची गाडी थांबलेली आहे. या माहितीवरून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. तिथे टाटा इंट्रा (क्र. MH-29 BE-6172) हे वाहन संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये ४ गायी आणि ४ कालवडी अशा एकूण ८ गोवंशीय जनावरांना तोंडाला दोरीने घट्ट बांधून अत्यंत निर्दयतेने कोंडलेले आढळले. ही जनावरे वणी येथून तेलंगणातील बेला येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होती.

या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक मुन्नु अनवर शेख (वय ३६, रा. पलवाल, हरियाणा, ह.मु. वणी) याला अटक केली आहे. तसेच यातील मुख्य सूत्रधार युनुस (रा. वणी) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

​या कलमान्वये झाली कारवाई:

​महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) कलम ५(अ), ५(ब), ६, ९.

​प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम १९६०, कलम ११(१)(ड).

​मोटार वाहन कायदा कलम १८४.

​सदर कारवाई पोलीस शिपाई जितेंद्र राजुरकर, ग्रेड पोउपनि नैताम आणि चालक पोशी विक्रम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहेत.

Popular Articles

error: Content is protected !!