Tuesday, April 21, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

हद्दपारीनंतरही गुन्हेगाराला कायद्याचा धाक उरला नाही? कोरपना पोलीस ठाण्यात अमरची हजेरी चर्चेचा विषय.

हद्दपारीनंतरही गुन्हेगाराला कायद्याचा धाक उरला नाही? कोरपना पोलीस ठाण्यात अमरची हजेरी चर्चेचा विषय.

​कोरपना: कायद्याचा धाक उरला नाही की गुन्हेगारांचे मनोबल किती वाढते, याचाच प्रत्यय सध्या कोरपना तालुक्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातून चार महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार अमर मधुकर वेट्टी याचा हद्दपारीचा कालावधी संपताच, त्याने पुन्हा एकदा आपल्या जुन्या व्यवसायात म्हणजेच अवैध दारू विक्रीत स्वतःला झोकून दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व प्रकरणामागे एका ‘वसुली’ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याची चर्चा आता जोरात सुरू असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​तडीपारी संपली, गुन्हेगारी सुरूच

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या काही दिवसांपूर्वीच अमर वेट्टी याच्या तडीपारीचा कालावधी संपला आहे. जिल्ह्यात परतल्यानंतर सुधारण्याऐवजी त्याने अधिक वेगाने कोरपना आणि वनसडी परिसरात अवैध दारूचा पुरवठा सुरू केला आहे. रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर दारूच्या खेपा या परिसरात उतरवल्या जात असून, परिसरातील तरुण पिढी या व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र आहे.

​’तो’ संशयास्पद अधिकारी कोण?

अमर वेट्टी (रा. वनसडी) याच्यावर २०१६ पासून दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल ६५(ई) नुसार अनेक गुन्हे दाखल आहेत. याच गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे उपविभागीय दंडाधिकारी राजुरा यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याला चार महिन्यांसाठी हद्दपार केले होते. मात्र, परत येताच त्याने पुन्हा हिमतीने अवैध धंदा सुरू केल्याने, त्याला पोलीस विभागातील किंवा संबंधित यंत्रणेतील एका ‘वसुली’ अधिकाऱ्याचे संरक्षण मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

​पोलीस ठाण्यातील ‘ती’ भेट चर्चेत!

दि. २० एप्रिल २०२६ रोजी सराईत गुन्हेगार अमर वेट्टी हा थेट कोरपना पोलीस स्टेशनमध्ये आढळल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तडीपारी भोगून आलेला गुन्हेगार पोलीस ठाण्यात नक्की काय करत होता? अधिकारी आणि त्याच्यात काय चर्चा झाली? या प्रश्नांची उत्तरे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच समोर येऊ शकतात.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईची अपेक्षा

देशोन्नती व इतर वृत्तपत्रांतून सातत्याने बातम्या प्रसिद्ध होऊनही कोरपना हद्दीतील अवैध दारू विक्री बंद झालेली नाही. आता पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी या ‘वसुली’ प्रकरणाचा छडा लावून संबंधित अधिकारी आणि गुन्हेगारावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१) अंतर्गत कडक कारवाई करणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!