चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयात १८ जून रोजी ‘पेन्शन अदालत’; निवृत्तीवेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
चंद्रपूर: राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आणि पेन्शन प्रकरणांवरील आवश्यक कार्यवाहीला गती देण्यासाठी चंद्रपुरात विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. येत्या १८ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे ‘पेन्शन अदालत व कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत चंद्रपूरच्या जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी सविस्तर माहिती दिली. सेवानिवृत्तीनंतर वेतनधारकांना भेडसावणाऱ्या विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करणे, तसेच त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे हा या अदालतीचा मुख्य उद्देश आहे.
दिनांक: १८ जून २०२६ वेळ: सकाळी ११:०० वाजता स्थळ: जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर
या पेन्शन अदालत आणि कार्यशाळेमध्ये प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) आणि राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि सदर पेन्शन अदालतीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी केले आहे.





