काँग्रेसकडून ‘वंदे मातरम्’चा अपमान; नांदा फाटा येथे भाजपा युवा मोर्चाचे जोरदार निदर्शने!
नांदा:
दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ अर्ध्यातच थांबवून त्याचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा (चंद्रपूर जिल्हा ग्रामीण) यांच्या वतीने कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे आणि भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात, तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तनय देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
निषेध सभेला संबोधित करताना पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या या कृतीचा तीव्र शब्दांत धिक्कार केला.राष्ट्रीय अस्मितेचा प्रतीक: ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक आहे.
अवमान सहन करणार नाही: राष्ट्रीय गीताचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे; राष्ट्रीय प्रतीकांचा कोणताही अवमान भाजपा सहन करणार नाही.
राष्ट्राचा सन्मान सर्वोच्च: राष्ट्रहित आणि राष्ट्रीय प्रतीकांच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टी सदैव तत्पर आणि ठाम राहील.
या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजपा कोरपना तालुका अध्यक्ष संजय मुसळे, महामंत्री सतीश उपलंचीवार, अरुण रागीट, पुरुषोत्तम भोंगळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, गडचांदूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक अरुण डोहे आणि युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दिनेश खडसे. भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी डोहे, तालुकाध्यक्ष सौ. स्मिता चिताडे, नांदा शहराध्यक्ष सौ. नम्रता डुकरे आणि सौ. संगीता मुसळे. नगरसेवक सुरज पांडे, सरपंच नैयनेश आत्राम, प्रमोद कोडापे, रमेश चौधरी, नितेश भिवापूर, सतीश जमदाडे, रंजीता धाभेकर, संगीत जोगी, निशा नवले, सुनीता आत्राम, सुजता चुदरी, वंदना बोभाटे, अश्विनी डाखरे, शालू मोहजे, तसेच इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राष्ट्राचा सन्मान सर्वोच्च — राष्ट्रीय गीताचा अपमान सहन केला जाणार नाही!” अशा देशभक्तीपर आणि आक्रमक घोषणांनी संपूर्ण नांदा परिसर दुमदुमून गेला होता.




