एकाच दिवसात गडचांदूर पोलिसांचे दोन जबरदस्त तडाखे! जे पॅलेस बारवर धाडी टाकून जुगार अड्ड्यांचा केला पर्दाफाश; ६ जुगारू जाळ्यात, तर २ जण भिंतीवरून फरार!
गडचांदूर / कोरपना (चंद्रपूर):
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने धडक मोहीम उघडली आहे. याचाच प्रत्यय देत गडचांदूर पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या अंतरात एकाच दिवशी (दि. २६ ऑक्टोबर २०२६) दोन धडाकेबाज कारवाई करत जुगार अड्ड्यांचे कंबरडे मोडले आहे. गडचांदूर ते कोरपना मार्गावरील ‘जे पॅलेस’ बार आणि त्याच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या या अचानक छापासत्रामुळे अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कारवाई पहिली: बारच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू होता जुगार; २२ हजारांच्या मोबाईलसह ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त!
दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी १७:३० ते १९:०० दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ‘जे पॅलेस’ बारच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली. बारच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये काही इसम गोल आकारात बसून ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये पळापळ उडाली. या कारवाईत पोलिसांनी ३ जणांना रंगेहात पकडले, तर अन्य २ आरोपी पाठीमागच्या दरवाजातून भिंतीवरून उडी मारून पसार होण्यात यशस्वी झाले.
पकडलेले आरोपी:
गणपत निळकंठ कोल्हे (वय ५०, रा. म्हाडा कॉलनी, नांदा)
अमोल तुकाराम राठोड (वय ३२, रा. डब्लूसीएल क्वॉर्टर, चंद्रपूर)
अंकुश वासुदेव डंभारे (वय ४२, रा. पाठाळा, भद्रावती)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: रोख रक्कम, ओपो व सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन्स आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ६७,८५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी पोलीस नाईक संतोष नागुलवाड यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम ४, ५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाई दुसरी: बिअर बारच्या मागच्या बाजूला सुरू असलेल्या जुगारावर दुपारीच छापा!
त्याच दिवशी पहिल्या कारवाईच्या काही तास आधी, दुपारी १३:३७ ते १४:३० दरम्यान पोलिसांनी याच ‘जे पॅलेस’ बिअर बारच्या मागच्या भागात सुरू असलेल्या आणखी एका जुगार अड्ड्यांवर दुसरा मोठा दणका दिला. बिअर बारच्या मागे उघड्यावर पत्ते कुटत जुगार खेळणाऱ्या ३ जणांना पोलिसांनी कॉर्नर करत ताब्यात घेतले.
पकडलेले आरोपी:
पंकज राजेश भसारकर (वय ४२, रा. गडचांदूर)
संजय शालिक क्षीरसागर (वय २९, रा. वणसडी)
प्रवीण शंकर लिहीतकर (वय ३२, रा. नांदाफाटा)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: आरोपींच्याअंगझडतीतून आणि जुगार अड्ड्यावरून रोख रक्कम व पत्ते असा एकूण ६,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस नाईक प्रकाश बाजगीर यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) नुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांचा कडक इशारा:
एकाच दिवशी एकाच ठिकाणाशी संबंधित परिसरामध्ये दोन यशस्वी कारवाई करून गडचांदूर पोलिसांनी अवैध जुगार चालवणाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रमोद बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भविष्यातही असे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा कडक इशारा या कारवाईवरून मिळाला आहे.




