Saturday, October 31, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

खाकीचा दरारा कायम! कोरपना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपींकडून चोरीची पल्सर NS 160 हस्तगत, तपास पथकाचे सर्वत्र कौतुक!

खाकीचा दरारा कायम! कोरपना पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपींकडून चोरीची पल्सर NS 160 हस्तगत, तपास पथकाचे सर्वत्र कौतुक!

कोरपना:

​“चोर कितीही चलाख असला, तरी पोलिसांच्या लांब हातांपासून आणि खाकीच्या जरबेपासून तो वाचू शकत नाही!” याचीच प्रचिती कोरपना पोलिसांनी पुन्हा एकदा आणून दिली आहे. कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरांच्या मुसक्या आवळत पोलिसांनी एका थरारक कारवाईत चोरीस गेलेली पल्सर NS 160 (क्रमांक MH 34 BJ 4733) ही मोटारसायकल जप्त केली असून, दोन खतरनाक चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईने परिसरातील वाहन चोरांचे धाबे दणाणले आहेत!

​परसोडा फाट्यावर रचला सापळा; चक्रावून सोडणारी कारवाई!

​पोलीस स्टेशन कोरपना येथे दाखल अपराध क्रमांक 344/2026 मधील वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी आपले जाळे पसरले होते. तपासचक्रे वेगाने फिरवत ३० ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस पथकाने परसोडा फाटा परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत महेश सुरेश पोतुकलवार आणि आशिष ऊर्फ ऋतिक जानकीराम चौधरी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीची पल्सर गाडी जप्त केली. पोलिसांनी केलेल्या या तडाखेबंद कारवाईमुळे वाहन चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

​पोलिसांच्या या धडक कारवाईमागे उच्चस्तरीय मार्गदर्शनाचा मोठा वाटा होता. पोलीस अधीक्षक  आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे, आणि गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी,  रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी सांगाडा रचण्यात आला.

​कोरपना पोलीस स्टेशनचे शिलेदार, पोलीस निरीक्षक  विनोद रहांगडाले यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने जिद्दीने आणि शिताफीने ही कारवाई फत्ते केली. या विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक, जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वाकूलकर (बक्कल क्र. ९६९), नामदेव पवार (बक्कल क्र. १२२६) आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र राजुरकर (बक्कल क्र. १६६) यांनी जीवाची बाजी लावत ही कारवाई यशस्वी केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

​”परिसरात वाहन चोरांना कुठल्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करावीत, सुरक्षेसाठी योग्य लॉकचा वापर करावा आणि परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ कोरपना पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरपना पोलिसांच्या या झंझावाती आणि धाडसी कारवाईचे संपूर्ण तालुक्यातून जोरदार कौतुक होत असून, चोरांच्या मनात आता खाकीची दहशत निर्माण झाली आहे!

Popular Articles

error: Content is protected !!