Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

आयुष्मान भारत कार्ड नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी

आयुष्मान भारत कार्ड नाकारणाऱ्या खासगी रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी

चंद्रपूर येथील  मुसळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलवर होणार  कारवाई?

 चंद्रपूर : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेच्या लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल मुसळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चंद्रपूर डॉ. विनोद मुसळे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी लाभार्थी कुटुंबाने केली आहे. कार्ड असूनही उपचारासाठी रोख पैशांची मागणी करून रुग्णालयाने सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असलेले लीलाधर फरकाडे यांना किरकोळ अपघात या कारणामुळे उपचारासाठी मुसळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर येथे दि.17/10/2025 रोजी दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे असलेले वैध ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)’ कार्ड दाखवले आणि योजनेअंतर्गत मोफत उपचारांची मागणी केली.

मुसळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कडून रोख पैशांची मागणी: रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील डॉ. विनोद मुसळे यांनी हे कार्ड स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. “आयुष्मान कार्डाचा लाभ आता मिळत नाही, व या उपचारासाठी चालत नाही आम्हाला शासनाकडून किमान ₹ 15000/- हजार रक्कम मिळते म्हणून आम्ही सदरचे उपचार हे आयुष्यमान कार्ड अंतर्गत करणार नाही ” असे कारण देत, त्यांनी उपचारासाठी ₹ 60000/- रोख रक्कम भरण्यास सांगितले. गंभीर परिस्थितीत आणि उपचाराला विलंब होऊ नये म्हणून, कुटुंबीयांना कर्ज काढून किंवा कसेतरी ही रक्कम भरावी लागली.

योजनेचा उद्देश असफल: रुग्णालयाच्या या कृतीमुळे गरीब आणि गरजू रुग्णांना आयुष्मान भारत योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे, ज्यामुळे योजनेचा मूळ उद्देश असफल ठरत आहे. आयुष्मान भारत योजनेच्या नियमांनुसार, सूचीबद्ध (Empaneled) रुग्णालयांना पात्र लाभार्थ्यांना मोफत उपचार देणे बंधनकारक आहे.

कारवाईची मागणी: या घटनेनंतर, लीलाधर फरकाडे यांच्या नातेवाईकांनी तातडीने राज्य आरोग्य यंत्रणा (State Health Agency – SHA) आणि जिल्हा प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, आयुष्मान कार्ड नाकारणाऱ्या डॉक्टर/रुग्णालयावर केवळ दंडच नव्हे, तर रुग्णालयाचे योजनेतील सूचीबद्धता (Empanelment) रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात इतर रुग्णांना असा त्रास सहन करावा लागणार नाही.

​प्रशासनाकडून प्रतिसाद: याबाबत प्रशासकीय अधिकारी डॉ. रुपेश कुमारवार आरोग्य विभाग चंद्रपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, “तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून, चौकशी समिती नेमण्यात येईल चौकशीमध्ये दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयावर निश्चितपणे नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. आयुष्मान कार्ड नाकारणे हा गंभीर गुन्हा आहे.” अशा प्रकारच्या घटनांविरुद्ध आवाज उठवणे आणि तक्रार दाखल करणे हे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे आहे.

Popular Articles

error: Content is protected !!