Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी केंद्रांभोवती निर्बंध – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी केंद्रांभोवती निर्बंध – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश

चंद्रपूर: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांमध्ये तसेच भिसी नगरपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल. या अनुशंगाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विशेष निर्बंध लागू करण्याचा आदेश जारी केला आहे.

1 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत खालील निर्बंध लागू मतदान व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात :

👉 अनधिकृत जमाव, सार्वजनिक सभा, वाहनांची वर्दळ बंदी

👉 भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे, प्रचार साहित्य यांवर बंदी

👉 मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहने वापरण्यास मनाई

👉 मोबाईल, वायरलेस सेट इत्यादी मतदान केंद्रात नेण्यास बंदी (अधिकृत कर्मचारी वगळता)

👉 धोक्यातील व्यक्तींना सुरक्षा दलासह 100 मीटर परिसरात येण्यास निर्बंध

👉 मतमोजणी केंद्राबाहेरील 100 मीटर परिसरातील दुकाने, आस्थापना बंद

👉 मतमोजणी केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

👉 ड्रोन उडविण्यास सक्त मनाई

प्रतिबंधातून सूट: 👉“डोअर टू डोअर” प्रचार (5 पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई)

👉 अँबुलन्स, दवाखान्याच्या गाड्या, दूधगाड्या, पाणी टँकर, पोलिस, वीज, निवडणूक कर्मचारी यांची वाहने

👉 बसस्थानक, रेल्वे स्थानक किंवा हॉस्पिटलकडे जाणारी वाहने

👉 दिव्यांग/आजारी मतदारांना त्यांच्या वैयक्तिक वाहनाने मतदानासाठी ये-जा जिल्हादंडाधिकाऱ्यांचे हे आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सही व कोर्टाच्या शिक्क्यासह जारी करण्यात आले असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेशाचे व्यापक प्रसारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Popular Articles

error: Content is protected !!