Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

संसद की पिकनिक स्पॉट? राहुल गांधींच्या ‘चाय-पार्टी’चा कोरपना भाजप कार्यकर्त्यांकडून समाचार!

संसद की पिकनिक स्पॉट? राहुल गांधींच्या ‘चाय-पार्टी’चा कोरपना भाजप कार्यकर्त्यांकडून समाचार!

कोरपना: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे देशाच्या विकासाची चर्चा करण्याचे ठिकाण. मात्र, काँग्रेसच्या खासदारांनी या पवित्र वास्तूच्या प्रवेशद्वारावर चहा-बिस्किटांचा आनंद घेत संसदेच्या प्रतिष्ठेला हरताळ फासला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोरपना येथे महामोर्चा काढण्यात आला.

तालुकाध्यक्षांनी  यावेळी बोलताना सांगितले की, “ज्या जनतेने या खासदारांना संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पाठवले, ते तिथे जाऊन फोटो सेशन आणि नाश्ता करत आहेत, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. ही लोकशाहीची थट्टा असून अध्यक्षांच्या आदेशाचा अनादर आहे.”

यावेळी कार्यकर्त्यांनी फलक दाखवून काँग्रेसच्या ‘फोटोग्राफी’ राजकारणाचा निषेध केला. गॅस टंचाईच्या वावड्या उठवून सामान्य जनतेला घाबरवणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा आता समोर आला आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

Popular Articles

error: Content is protected !!