Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

समता आणि न्यायाचा जागर! कोरपना येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

समता आणि न्यायाचा जागर! कोरपना येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

कोरपना: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरपना येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. निळा गुलाल आणि ‘जय भीम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

​कार्यक्रमाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रेरणादायी जीवनावर प्रकाश टाकला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, समता आणि बंधुतेची शिकवण देणाऱ्या महामानवाच्या कार्याचे स्मरण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने:

​संजय मुसळे (तालुकाध्यक्ष, भाजप), अमोल आसेकर (शहराध्यक्ष, भाजप)अरुण मडावी, (जिल्हा अध्यक्ष, आदिवासी आघाडी)अबरार अली, (शहर महामंत्री)ॲड. पवन मोहितकर, पवन बुरेवार (युवा मोर्चा शहराध्यक्ष) यांच्यासह पुंडलिक उलमाले, सत्यवानजी घोटेकर, मोबीन बेग, जितेंद्र पिंपळकर, राजू लांडगे, नागोबा आत्राम, गणेश भोयर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

​”बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना हाच आपल्या देशाचा खरा आधार आहे. त्यांच्या विचारांची कास धरूनच समाजाचा विकास शक्य आहे,” अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा केंद्रातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles

error: Content is protected !!