Wednesday, June 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयात १८ जून रोजी ‘पेन्शन अदालत’; निवृत्तीवेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयात १८ जून रोजी ‘पेन्शन अदालत’; निवृत्तीवेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

​चंद्रपूर: राज्य शासनाच्या सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी आणि पेन्शन प्रकरणांवरील आवश्यक कार्यवाहीला गती देण्यासाठी चंद्रपुरात विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. येत्या १८ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे ‘पेन्शन अदालत व कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे.

​या महत्त्वपूर्ण उपक्रमाबाबत चंद्रपूरच्या जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी सविस्तर माहिती दिली. सेवानिवृत्तीनंतर वेतनधारकांना भेडसावणाऱ्या विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करणे, तसेच त्यांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे हा या अदालतीचा मुख्य उद्देश आहे.

दिनांक: १८ जून २०२६ वेळ: सकाळी ११:०० वाजता स्थळ: जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर

​या पेन्शन अदालत आणि कार्यशाळेमध्ये प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. तरी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी (DDO) आणि राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि सदर पेन्शन अदालतीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी केले आहे.

Popular Articles