Friday, September 4, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

​”व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार”; श्री प्रभू रामचंद्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम उत्साहात

​”व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार”; श्री प्रभू रामचंद्र महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम उत्साहात

​नांदा:

युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि अमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून समाज दूर राहावा, या उद्देशाने श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नांदा येथे ‘नशामुक्त भारत अभियाना’अंतर्गत भव्य जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

​या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर पोलीस स्टेशनच्या PSI गायकवाड मॅडम, नांदा गावच्या सरपंच सौ. मेघाताई पेंदोर आणि मेजर वाभिटकर सर मंचावर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना अमली पदार्थ, तंबाखू व विविध व्यसनांपासून दूर ठेवणे, तसेच व्यसनांचे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणारे घातक परिणाम समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, व्यसन हे केवळ आरोग्याची हानी करत नाही, तर शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनावरही गंभीर परिणाम करते. त्यामुळे तरुणाईने कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा.

​’नशामुक्त भारत’ची सामूहिक शपथ

यावेळी उपस्थितांना अमली पदार्थांचे सेवन न करण्याचा निर्धार व्यक्त करत व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. “नशामुक्त भारत – सशक्त भारत” आणि “व्यसनाला नकार, उज्ज्वल भविष्याचा स्वीकार” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत झाली.

​कार्यक्रमाचे नेटके संचालन प्राध्यापिका सौ.निता मुसळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रमोद वाघाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Popular Articles