Friday, October 23, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

कन्हाळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची धूम!

कन्हाळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची धूम!

राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा, गोपाळकाला अन् विविध कार्यक्रमांची रेलचेल

कन्हाळगाव/कोरपना : श्रीकृष्ण जन्मोत्सव आयोजन समिती, कन्हाळगाव, ता. कोरपना, जि. चंद्रपूर यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा, विविध मनोरंजनात्मक स्पर्धा आणि गोपाळकाला अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

४ सप्टेंबर रोजी शुक्रवार आणि ५ सप्टेंबर रोजी शनिवार असे दोन दिवस हा उत्सव साजरा होणार असून, कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण मंदिर, बस स्टॉपजवळ, कन्हाळगाव येथे करण्यात आले आहे.

४ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे. तर ५ सप्टेंबर रोजी सकाळपासून श्रीकृष्ण जन्मोत्सवाशी संबंधित धार्मिक कार्यक्रम, पूजन व इतर उपक्रम पार पडतील. दुपारी मार्गदर्शन कार्यक्रमासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणाऱ्या राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धेत बालगोपाल सहभागी होणार असून, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीमती प्रतिभाताई  धानोरकर राहणार असून, उद्घाटक म्हणून आमदार देवराव दादा भोंगळे यांच्यासह परिसरातील विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग कार्यक्रमाला लाभणार आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कन्हाळगावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, गोपाळकाला कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होणार आहे. बालगोपालांसह सर्व भाविकांना या उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.

“श्रीकृष्ण जन्मोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, गावातील एकोपा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव आहे,” या भावनेतून सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्रीकृष्ण जन्मोत्सव आयोजन समिती तथा समस्त ग्रामवासी मंडळ, कन्हाळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!