स्टुडन्ट फोरम ग्रुपच्या पाणपोईचे उद्घाटन
कोरपना: येथील मुख्य बस स्टॉप चौकात थाटात उद्घाटन झाले या उपक्रमामुळे गरजूंना पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. ही पाणपोई शहराच्या मुख्य ठिकाणी उघडल्यामुळे लोकांना याचा खूप उपयोग होईल
या कार्यक्रमात प्रामुख्याने स्टुडन्ट फोरम ग्रुपचे सदस्य तसेच स्थानिक मान्यवर आणि नागरिकांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पाण्याचे महत्त्व आणि पाणपोईची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला. उपस्थित लोकांच्या हस्ते पाणपोईचे फीत कापून उद्घाटन झाले. स्टुडन्ट फोरम ग्रुप हे सामाजिक हिताची जाणीव ठेवून नेहमीच अनेक समाज उपयोगी प्रकल्प राबवते. सध्या उन प्रचंड वाढले असून उष्माघाताचे प्रमाणही वाढले आहे. अशात या पाणपोईमुळे प्रवाशांना नागरिकांना मोठा दिलासा प्राप्त झाला.पाणपोईमध्ये थंड आणि शुद्ध पाण्याची सोय आहे.पाणपोईची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्यात आली आहे.
या पाणपोईमुळे उन्हाळ्यात लोकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. पाणपोईमुळे गरजू लोकांना मोफत पाणी मिळेल. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आहे. हा उपक्रम इतर लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
या पाणपोईमुळे लोकांना खूप मोठा फायदा होईल आणि सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळेल, यात शंका नाही.






