Friday, April 17, 2026

संपादक

मोहब्बत खान
संपादक
97646 3784297646 37842

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

रुग्णसेवेसाठी मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सदैव कटिबद्ध! – आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

रुग्णसेवेसाठी मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र सदैव कटिबद्ध! – आमदार देवराव भोंगळे यांचे प्रतिपादन

गडचांदूरात भव्य महाआरोग्य शिबीर संपन्न.

१५९० रुग्णांची मोफत तपासणी तर ३९२ रुग्णांना विविध शस्त्रक्रियेचे निदान.

गडचांदूर:राजुरा विधानसभा क्षेत्राचे सेवाभावी आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या संकल्पनेतून आणि मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भाजपा गडचांदूर च्या वतीने स्थानिक स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळेत आज भव्य महाआरोग्य शिबीर पार पडले; या शिबीराचा गडचांदूर शहरासह परिसरातील १५९० शिबीरार्थींनी लाभ घेतला.

सकाळीच सुरू झालेल्या या शिबीरात नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रिरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, अस्तिरोग, त्वचारोग, मेडीसीन व कॅन्सर यांसारख्या रोगांवरील तज्ञ डॉक्टरांनी शिबीरार्थींची तपासणी केली. यामध्ये तपासणी झालेल्या १५९० रुग्णांपैकी ३९२ रूग्ण हे विविध शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरले आहेत त्यांचेवर टप्प्या-टप्प्याने आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे शस्त्रक्रिया पार पडतील.

आयोजक तथा आमदार श्री. देवराव भोंगळे आपल्या उद्घाटनीय मनोगतात म्हणाले की लोकनेते, विकासपुरुष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्हाला सेवेचा मंत्र दिला आहे. खरंतर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नावाचं समानार्थी शब्दच सेवा असा होतो आणि त्यांच्या सेवेचा वसा पुढे नेत मागील अनेक वर्षांपासून आम्ही मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून अशाप्रकारे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करून रुग्णसेवा देतो. आजच्या या महाआरोग्य शिबीरात १५९० एवढ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आपल्या आरोग्यासंबंधी तपासण्या केल्या. अनेक गरजू माताभगिनींना यामुळे आजारांचे निदान व उपचार मिळविता आले.

पुढे बोलताना, हे महाआरोग्य शिबीर गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या आमच्या ध्येयाचा एक भाग आहे. आपणा सर्वांना माहित आहे, की आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. निरोगी शरीर आणि मन असेल, तर आपण अधिक उत्साहाने आणि कार्यक्षमतेने आपले जीवन जगू शकतो. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात, अनेकवेळा आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वेळेवर तपासणी न करणे, योग्य आहार न घेणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे या महाआरोग्य शिबिराचा उद्देश हाच आहे की आपल्या सर्वांना आपल्या आरोग्याबद्दल जागरूक करणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आवश्यक आरोग्य सेवा आपल्या दारापर्यंत पोहोचवणे. आपला एक छोटासा प्रयत्न समाजातील गोरगरीब बांधवांना भविष्यात मोठ्या आरोग्य समस्यांपासून वाचवू शकतो आणि हेच ब्रीद जानून मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र नेहमीच आपल्या समाजाच्या आरोग्यासाठी कटिबद्ध आहे. भविष्यातही प्रत्येक गावगुड्यावर अशा प्रकारचे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. असेही ते म्हणाले.

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरूण डोहे, भाजप अनू जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, शहर महामंत्री हरीश घोरे, शंकर आपुरकर, प्रमोद कोडापे, रामसेवक मोरे, महेश घरोटे, भास्कर उरकुडे, अरविंद एकरे, शिवाजीराव सेलोकर, पुरुषोत्तम भोंगळे, गोपाल मालपाणी, शेख मेहताब, आशिष ताजने, धम्मकीर्ती कापसे, जगदीश पिंपळकर, प्रमोद पायघन, भाजममोच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे, शहराध्यक्षा शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार, उमा कंठाळे, नमिता विश्वास सपना सेलोकर, विना मुद्दलवार, रंजना मडावी, जयंता भोंगळे, गजानन शिंगरू, पुरुषोत्तम ठाकरे, यांचेसह इरत अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला.

Popular Articles

error: Content is protected !!