Friday, October 16, 2026

संपादक

Top 5 This Week

spot_imgspot_imgspot_img

Related Posts

9 जून रोजी दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप

9 जून रोजी दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना साहित्य वाटप

चंद्रपूर, दि. 4 जून : शिबिरातील तपासणीअंती जिवती तालुक्यातील पात्र दिव्यांग व जेष्ठ नागरीक लाभार्थ्यांना 9 जून 2025 रोजी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) यांच्या माध्यमातून जिवती तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी 30 नोव्हेंबर 2023 रोजी आणि 30 मे 2025 रोजी तपासणी शिबीर घेण्यात आले. या दोन्ही शिबिरातील एकूण पात्र 413 लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप होणार आहे.

सदर योजनेतंर्गत ट्रायसायकल, व्हीलचेअर, बॅटरीवर चालणारी ट्रायसायकल, क्रचेस, वॉकिंग स्टीक, रोएटर, सीपी चेअर, बीटीई हिअरींग एड, वॉकर, स्टीक, बेल्ट, स्पायनल सपोर्ट, सर्व्हाइकल, केन, स्लेट, किट व इतर उपकरणे दिव्यांग व वृध्द लाभार्थ्यांना मिळणार आहेत. जिवती तालुक्यातील दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी 413 पात्र लाभार्थ्यांना योजनेमधून दिव्यांग व 60 वर्षावरील वृध्द व्यक्तींसाठी लागणारे सहाय्यक उपकरण साहित्याचे वाटप 9 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक ऊईके, यांचे हस्ते करण्यात येईल.

सदर कार्यक्रम गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन हॉल अॅन्ड लॉन, येथे नियोजित केला आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

Popular Articles

error: Content is protected !!